दोरीवरच्या उड्या
शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे= जम्प रोप (दोरी उडी)
गेले अनेक दिवस महाराष्ट्र व देशात लॉकडॉन चा कार्यकाल सुरू आहे. या लॉकडॉन च्या काळात सर्वांनाच घरी बसावे लागले .अर्थातच तो आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी योग्य निर्णय आहे. पण सर्वांच्या समोर पडलेला एक मोठा प्रश्न आहे? तो म्हणजे घरी बसून करायचे काय, कारण एकवीस दिवस किंवा त्याहीपेक्षा अजून काही दिवस जर घरी बसावे लागले तर आपली दिनचर्या किंवा आपले आरोग्य याची काळजी घ्यायची तरी कशी? कारण प्रत्येक जण आरोग्याच्या बाबतीत जागरूक आहे. असे म्हणायला हरकत नाही .कारण दररोज सकाळ असेल संध्याकाळ असेल आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून यासाठी कोणीच जिम करत आहे. तर कोणी योगा, नृत्य, एरोबिक्स,अशा अनेक माध्यमांचा वापर करून आपले आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र या लॉकडॉन च्या काळात घरीच बसावे लागल्यामुळे करायचे काय हा खूप मोठा प्रश्न आपल्या समोर उभा आहे .अशावेळी घरच्या घरी व्यायाम करणेच योग्य
म्हणून महाराष्ट्र राज्य जम्प रोप असोसिएशनचे सी.ई.ओ शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक जी दुधारे सर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रातील जम्प रोप च्या राज्य ,राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ,खेळाडूंसाठी घरी बसूनच जम्प रोप म्हणजे दोरीवरच्या उड्या मारणे हा उपक्रम त्यांनी हाती घेतला. व त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहे. हाच उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी जर अवलंबला तर नक्कीच त्यांचे आरोग्यही चांगले राहील. व कोरणा ला आपल्यापासून लांब ठेवण्यासाठी आपण यशस्वी राहू.
कारण असे म्हणतात की दोरीवरच्या उड्या सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे. कारण शरीराला योग्य आकार देणारा जणू तो एक कुंभार आहे. दोरीवरच्या उड्या मारल्यामुळे शरीराचे योग्य पोषण होते. आरोग्याचा योग्य विकास होण्यासाठी मदत होते. भूक चांगली लागते. तसेच पचनक्रिया सुधारते .शरीराला हलकेपणा जाणवतो. असे अनेक फायदे होतात.
नुसते घरी बसून राहणे म्हणजे पोट वाढण्यासाठी आमंत्रण देण्यासारखेच आहे. त्यामुळे पोट कमी करायचे असेल तर दोरीवरच्या उड्या हा सर्वात चांगला व्यायाम आहे .दोरीवरच्या उड्या हा खेळाडूंसाठी ही एक आदर्श व्यायाम आहे .पायाची ताकद वाढवण्यासाठी, पायांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी, मनगटाचे स्नायू सशक्त व लवचिक होण्यासाठी ,त्याचबरोबर हृदयाची फुफ्फुसांची ताकद वाढवण्यासाठी दोरी उड्या चा अधिक चांगल्या पद्धतीने उपयोग होतो म्हणून घरी बसून नुसते टीव्ही किंवा मोबाइल न पाहता दररोज दोरीवरच्या उड्या मारल्या शरीरातील कॅलरीज कमी करण्यासाठी त्याची मदत होईल. व आपले आरोग्य नक्कीच चांगले राहील. व कोरणा बरोबरचे युद्ध ही आपण सहज जिंकू शकेल
म्हणून सर्वांनी दररोज दोरीवरच्या उड्या मारा आपले आरोग्य चांगले ठेवा
दीपक अंकुश क्षीरसागर
सहसचिव
महाराष्ट्र राज्य जम्प रोप असोसिएशन

Comments
Post a Comment