ऑलिंपिक ची माहिती
सध्या क्रीडा क्षेत्रात सर्वांचे डोळे ऑलिंम्पिककडे लागले असून या खेळाचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. यावर्षी ऑलिम्पिक स्पर्धा लंडनमध्ये होणार असून लंडनने या खेळांची जय्यत तयारी केली आहे. अब्जावधींची उलाढाल करणारा हा खेळ, या खेळांमधील पदकांसाठी जीव तोडून खेळणारे खेळाडू, व कोणत्या देशाला किती व कोणती पदकं मिळतात यावर त्या देशाचा ठरलेला मान ह्या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या मानल्या जातात.
सर्वांत प्राचिन ऑलिंम्पिक खेळांचे आयोजन १२०० वर्षांच्याही पहिले इ.स. पूर्व ७७६ मध्ये योध्दा खेळाडूंमध्ये करण्यात आले. इ.स. ३९४ मध़्ये शेवटचे ऑलिंम्पिक खेळण्यात आले. त्यानंतर लवकरच हे खेळ बंद झाले. कारण रोमचा सम्राट थियोडोसिस याने ह्या खेळांना मूर्तीपूजेचा उत्सव म्हणून संबोधले व या खेळांवर बंदी आणली. जवळपास दीडशे वर्ष या ऑलंम्पिक खेळांना विसरण्यात आले. या काळात काही वर्गांमध्ये खेळाच्या स्पर्धा होत होत्या. परंतु त्याला खेळांच्या आयोजनाचा दर्जा देण्यात आला नव्हता. रोम व ग्रीस सारख्या वर्चस्व असलेल्या हुकुमशाहीच्या काळात लोकांकडे खेळासाठी वेळच उरला नव्हता.
१९ व्या शतकात युरोपमध्ये सर्वसामान्य विचारसरणीचा विकास झाला. प्राचिन काळातील या खेळाच्या परंपरेला पुनरूज्जीवन मिळाले. या खेळांना पुन्हा सुरु करण्याचे श्रेय ते म्हणजे फ्रान्सचा महान व्यक्ती बॅरो पियरे डी कुवर्तेन याला.
कुवर्तनने प्रमुख दोन उद्देश समोर ठेवले. एक म्हणजे आपल्या देशात खेळांना लोकप्रियता मिळवून देणे व दूसरे म्हणजे सर्व देशांना एका शांतीपुर्णपध्दतीने प्रतिस्पर्धी म्हणून एकत्रित आणणे. कुवर्तनच्यामते खेळ हे युध्द टाळण्यावरील एक पर्याय आहे. युध्द टाळण्यासाठी खेळांचा उपयोग केला जाऊ शकतो असे त्याला वाटायचे.
कुवर्तेनच्या याच कल्पनेच्या आधारावर १९८६ ला सर्वात पहिल्यांदा आधुनिक ऑलिंम्पिक खेळांचे आयोजन ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये करण्यात आले. कुवर्तेनच्या या कल्पनेला कोणत्याच राजकीय शक्तीची साथ नसल्यामुळे सुरुवातीच्या दशकापर्यंत ऑलिंम्पिक चा आपले अस्तित्व वाचवण्यासाठीचा संघर्ष चालूच राहिला. १९०० ला पॅरीस तसेच १९०४ लुई मध्ये झालेले दोन्ही ऑलिंम्पिक खेळ काही विशेष लोकप्रियता मिळवू शकले नाही. कारण की दोन्हीवेळेस ऑलिंम्पिक ला मोठे आयोजन करता आले नाही. परंतु लंडनमधील चौथ्यावेळेसचे ऑलिंम्पिक खेळ हे प्रचंड लोकप्रिय ठरले. ऑलिंम्पिक ची शक्ती त्यावेळेस संपूर्ण जगाला कळाली. या खेळांत २००० अॅथलिटस्नी सहभाग नोंदवला. मागील तिनही खेळांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंपेक्षा ही संख्या खूप मोठी होती. यानंतर १९३० ला बर्लिनमध्ये झालेले ऑलिंम्पिक पाहता या खेळात आता नवीन शक्तीने समावेश केला असे जाणवले. सामाजिक व राजकीय स्तरावर चालू असलेल्या भांडणात नाझींनी या खेळाला आपल्याला श्रेष्ठ ठरवण्याचे साधन माध्यम बनवून घेतले.
१९५०च्या दशकात खेळाच्या मैदानावर सोविएत-अमेरिका हे दोन्ही प्रतिस्पर्धीच्या रुपात समोर आल्यावर ऑलिंम्पिक ला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या नंतर हा खेळ हा राजकारणापासून कधीच वेगळा झाला नाही तर हा राजकारणाचा सर्वात महत्वाचा भागच झाला. सोविएत संघ व अमेरीका सारखे महाबलाढ्य देश युध्दाच्या मैदानावर कधी समोरासमोर येऊ शकले नाही म्हणून त्यांनी ऑलिंम्पिक लाच आपली श्रेष्ठता दाखवण्याचे माध्यम बनवून घेतले. अमेरिकाचे माजी राष्ट्रपती जॉन एफ. केनेडी यांनी एकादा भाषणात सांगितले, की अंतराळ यान आणि ऑलिंम्पिक चे सुवर्णपदक हेच कोणत्याही देशाच्या प्रतिष्ठेचे प्रतिक असू शकतात.
हेच अंतराळ यान व ऑलिम्पिक चे सुवर्णपदक शीतयुध्दाच्या काळात सर्वात महत्वाचे ठरले. मोठ्या खेळांचे आयोजन करणे हे या शांतियुध्दाचे महत्वाचे भाग बनले तर खेळाचे मैदान हे युध्दभूमी झाले. सोविएत संघाने मेक्सिको येथे १९६८ ला ऑलिंम्पिक मध्ये अमेरीकेकडून पदकांसंदर्भात झालेल्या पराजयाचा बदला १९७२ मध्ये म्यूनिख ऑलंपिकमध्ये घेतला. सोविएत येथील नागरीक त्यांच्या ५०व्या वर्धापन वर्षात अमेरिकेकडून हार स्विकारायला तयार नव्हते. परिणामी सोविएत अॅथलिटस्नी त्यावर्षी ५० सुवर्ण पदकांसमवेत एकूण ९९ पदकं जिंकली. म्हणजे अमेरिकेने जिंकलेल्या पदकांच्या एक तृतीआंश जास्त पदके सोविएत ने त्यावर्षी जिंकली होती. अमेरिका व त्याच्या पश्चिमी राष्ट्रांनी १९८० च्या मॉस्को ऑलिंम्पिकमध्ये सहभागी होण्यास नकार दिला. यानंतर १९८४ मध्ये लॉस एंजलिस येथील ऑलिंम्पिक खेळांमध्ये परतफेड
म्हणून सोविएत संघाने या खेळावर बहिष्कार टाकला. १९८८ च्या सेऊल येथील ऑलिंम्पिक खेळांमध्ये सोविएत संघाने पुन्हा एकदा त्यांचे वर्चस्व दाखवून देत १३२ पदकं जिंकली. यामध्ये ५५ सुवर्ण पदकं होती. तर अमेरिकेला ३४ सुवर्ण पदकांसमवेत एकूण ९४ पदक मिळाले होते. या खेळात अमेरिका पुर्व जर्मनीनंतर तिसरेस्थान पटकवले होते.१९९२ च्या बार्सिलोना येथील ऑलम्पिकमध्ये सोविएत संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले. परंतु तोपर्यंत सोविएत संघाचे तुकडे पडले होते. या सर्व तुकड्यांनी संयुक्त रुपाने खेळात भाग घेतला होता. यामध्ये त्यांनी ४५ सुवर्ण पदकांसमवेत एकूण ११२ पदकं जिंकली होती. त्यावर्षी अमेरिकेला ३७ सुवर्ण व एकूण १०८ पदकं मिळाली होती. यानंतर १९९६ च्या अॅटलांटा व २००० च्या सिडनी येथील ऑलिंम्पिक स्पर्धांमध्ये रशिया (सोविएत संघाच्या विभाजनानंतरचे नाव) हा दुस-या क्रमांकावर होता तर २००४ च्या अथेन्स येथील ऑलिंम्पिक मध्ये एक स्थान घसरून तो तिस-या स्थानावर पोहोचला. २००८ ला बीजिंग येथील ऑलिंम्पिकला आता पर्यंतच्या सर्वोत्कृष्ट आयोजनाचा मान मिळाला. आता ह्या २०१२ च्या लंडन येथील ऑलिंम्पिक मध्ये सर्वात जास्त सुवर्ण पदकं कोणता देश मिळवेल यावर सर्वांचे लक्ष टिकून आहे.

Comments
Post a Comment